Ravet Crime : टेम्पोच्या धडकेत दोन बहिणींचा मृत्यू

पोलिसांनी आरोपी टेम्पो चालकाला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने तपास करीत आहेत

एमपीसी न्यूज – मोपेड दुचाकीवरून जात असलेल्या दोन बहिणींच्या दुचाकीला एका टेम्पोने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघींचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 12) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रावेत बीआरटी रोड येथे झाला.

शीतल अभिजित गिरमे (वय 31, रा. भोंडवे नगर, रावेत), सायली ज्ञानेश्वर हेगडे (वय 28, रा. नवी सांगवी) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. याप्रकरणी शीतल यांचे पती अभिजित वसंत गिरमे (वय 35) यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक समाधान बाबू केंगले (वय 21, रा. परंदवाडी, सोमाटणे फाटा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मयत पत्नी शीतल आणि फिर्यादी यांची मेव्हणी सायली या दोघी नवी सांगवी येथून फिर्यादी यांच्या रावेत येथील घरी मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / डी क्यू 3506) जात होत्या.  रावेत बीआरटी रोडने जात असताना मस्के वस्तीकडे जाणा-या रस्त्याच्या कॉर्नरला एका टेम्पोने (एम एच 14 एच यु 5940) मोपेड दुचाकीला धडक दिली. यामध्ये शीतल आणि सायली या दोघी गंभीर जखमी झाल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपी टेम्पो चालकाला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.