BNR-HDR-TOP-Mobile

Ravet : बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने रावेत येथील हँगिंग ब्रिज चौकात बुधवारी (दि. 28) रात्री केली.

मोटाराम उर्फ प्रकाश देवराम मकराना (वय 24), हेमाराम शोभाराम सोलंकी (वय 22, दोघे रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सदाशिवराव गवते (वय 52) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील हँगिंग ब्रिज चौकात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांना दोघेजण संशयितरित्या थांबलेले दिसले. त्यांच्याकडे बेकायदेशीर गुटखा असल्याची खात्री झाल्याने त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना दहा हजार 922 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी हा गुटखा जप्त करत दोघांना अटक केली. त्यांच्यावर अन्न भेसळ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.