Ravet : अस्सल घरगुती स्वादाच्या मांसाहारासाठी हॉटेल मेजवानी

(अश्विनी जाधव )

एमपीसी न्यूज- दिवाळीचा गोडवा संपला आणि वेध लागले परत खादाडीचे.. काहीतरी स्पायसी खायची इच्छा होती. काही दिवसांपूर्वी एका नवीन हॉटेलच्या ओपनिंगचे बोर्डस सगळ्या रावेत मध्ये लागले होते. पण दिवाळी मुळे जाता आले नव्हते. मग काय टाकली धाड लगेच.

रविवार दुपार. पोटात कावळ्यांनी घातलेला धुडगूस आणि आम्ही पोचलो #Hotel_Mejwani मध्ये. भरपूर मोठी जागा. सिटिंग अरेंजमेंट पण आवडली.  टेकायला मस्त लोड होते म्हणजे आरामात बसा आणि मनापासून खा 😋😋😉 #चिकन_आळणी_सूप गरम गरम मिटक्या मारत संपवले.

तर मटण आणि फिश थाळी मागवली होती. पापलेट फिश #नक्की_नक्की_खा असा होता. टिपिकल #मालवणी पद्धतीने बनवलेला आणि मसाला आतपर्यंत पूर्णपणे मुरलेला. #सुख हो #सुख अजून काय. सुरमई फिशची ग्रेव्ही पण भारी. #सुकट तर मी मनापासून एन्जॉय करत खातेच. फिश थाळीला फुल मार्क्स माझ्याकडून !!

#मटण_थाळी त्याहून भारी. मटण प्रेमी जीवांसाठी तर विशेष पर्वणीच.. खिमाचा आवर्जून उल्लेख करेन.. मागून मागून घेतला 😉😋 बर माझी #खादाडी बघून माझ्यासाठी specially माझ्याचसाठी हां गरमा गरम चिकन रस्सा पाठवण्यात आला😜😜😜😋😋😉😉 आपला वट च आहे ना तसा 😛😛😜

#सोलकढी डायरेक्ट कोकणात घेऊन गेली असा 😜😜 लईच भारी असा. छान घट्ट आणि pure होती. 😉 दोन ग्लास परत मागवले.

एक गोष्ट आवर्जून सांगेन की सगळं जेवण #घरगुती होतं. घरी जेवल्यासारखं वाटलं एकदम. हॉटेलचे मालक स्वतः जातीने सगळीकडे लक्ष देत होते आणि स्वतः किचन मध्ये सगळे पदार्थ बनवत होते. त्यांच्या हाताची चव जेवणात उतरली होती हें नक्कीच.

रावेत मध्ये कुठेही असं #घरगुती_पद्धतीचं, #रुचकर आणि #चविष्ट मांसाहारी जेवण मिळत नाही. त्यामुळे आपल्यासाठी हें हॉटेल म्हणजे खरंच एक #मेजवानी आहे. तुम्हाला उगाच ते नुसतं तिखट आणि लाल लाल जेवण टाळायचं असेल तर मेजवानीला नक्की भेट द्या. माझ्या आत्तापर्यंतच्या #खादाड_प्रवासातील हा अप्रतिम अनुभव होता हे मनापासून सांगतीये. इतकं घरगुती आणि छान जेवण… मग काय खूप दिवसांनी परत एकदा #मोगॅम्बो_खुश_हुआ 😉😉😋😋

मटण थाळी 270/-
फिश थाळी 240/-

पत्ता – हॉटेल मेजवानी
सर्वे नंबर 107, BRT बस स्टॉप
रावेत

https://maps.google.com/?q=18.645400,73.743617

 

ejwani

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.