Ravet News: जलउपसा केंद्रात समाजकंटाकांकडून टाकली जातेय घाण; CCTV कॅमेरे बसवा, अन्यथा आंदोलन

थेरगाव सोशल फाऊंडेशनचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रावेत जलउपसा केंद्राजवळ रोज समाजकंटकांकडून जनावरांची चरबी, मृत जनावरे अशी घाण टाकली जात आहे. तेच पाणी प्रक्रिया करुन नागरिकांना दिले जात आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. नदीपात्राच्या दोन्ही बाजून CCTV कॅमेरे बसवून हा परिसर निगरानीत ठेवण्याची मागणी करुनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा थेरगाव सोशल फाऊंडेशनने दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका पवना नदीपात्रातून पाणीउपसा करते. त्यासाठी रावेत येथे पालिकेने जलउपसा केंद्र उभारले आहे. तेथून पाणी उचलून त्यावर योग्य प्रक्रिया करून ते पाणी जलवाहिनीद्वारे नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. गेल्या काही महीन्यांपासून या उपसाकेंद्राजवळ नदीपत्रात वारंवार मेलेली जनावरे तसेच जनावरांची चरबी टाकन्याचे काम अनोळखी समाजकंटकांकडून केली जात असल्याचे थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीरस्वरूपाची आहे.

त्यासाठी आम्ही गेल्या 2 महिन्यापासून महापालिकेला याची माहिती देत आहोत. यामुळे पाण्यामध्ये जर काही विध्वंसक घटक समावेश झाला. तर, संपूर्ण शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ही अतिसंवेदनशील बाब असल्याने या नदीपात्राच्या दोन्ही बाजून CCTV कॅमेरे बसवून हा परिसर आपल्या निगरानीत ठेवावा जेणेकरून त्याठिकाणावरून पाण्यामध्ये काही अनुसुचित व विध्वंसक घटक मिसळण्याचे काम कोणाकडून होता काम नये. पण अजूनही महापालिकेकडून यावर कोणतीच दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे आरोग्य, पाणीपुरवठा, पर्यावरण विभागाला पत्र दिले आहे. यावेळी राहुल सरवदे, अनिकेत प्रभु, प्रकाश गायकवाड, गणेश डांगे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.