Ravet News: कचरा टाकण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – कचरा टाकण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.21) साडेदहाच्या सुमारास रमाबाईनगर, रावेत येथे घडला.

याप्रकरणी 19 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल अप्पा कदम (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कचरा टाकण्यासाठी गेल्या असता आरोपी तिथे आला. फिर्यादीला जोरात ढकलले. त्या खाली पडल्या. त्यांचे तोंड दाबले. त्यात फिर्यादीचे छोटे मंगळसूत्र तुटले. अंगावरील कुर्ती फाटून फिर्यादीच्या मनास लज्जा होईल, असे वर्तन आरोपीने केले. फिर्यादी आरडाओरडा करु लागल्या असता मारहाण केली. शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड रावेत पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.