Ravet News : दीपक भोंडवे यांच्यावतीने रावेतमधील 80 सोसायट्यांमध्ये धूरफवारणी

एमपीसीन्यूज : कोरोनासारख्या महाभयंकर आजारातून बाहेर पडत असताना पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू, चिकन गुनिया व इतर साथरोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांच्या वतीने रावेत परिसरात धूरफवारणी करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत रावेत येथील 80 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धूरफवारणी करण्यात आली.

रावेतला स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा विडा दीपक भोंडवे यांनी उचलला आहे. त्यासाठी गावातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धूरफवारणी करण्यास प्रारंभ करण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी हा उपक्रम सुरु करण्यात आला. आतापर्यंत 80 सोसायट्यांमध्ये धूरफवारणी करण्यात आली. यापुढेही हा उपक्रम सुरु रहाणार आहे.

या उपक्रमासाठी हभप संतोष भोंडवे, सुनील भोंडवे, संतोष सु भोंडवे, प्रशांत कुंभार,  वीरेंद्र सोनवणे, राहुल चव्हाण यांनी मेहनत घेतली.

रावेतमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचे काम दीपक मधुकर भोंडवे निरपेक्ष भावनेतून करीत आहेत. आमच्या सिल्व्हर रेसिडेन्सी फेज 1 या सोसायटीत आठवड्यातून दोन दिवस धूरफवारणी केली जाते. त्यामुळे आमच्या सोसायटीतील नागरिक निश्चित आहेत. कोरोना काळातही त्यांनी आमच्या सोसायटीतील नागरिकांना खूप मदत केली.

धनंजय सोळुंके : रहिवाशी, सिल्व्हर रेसिडेन्सी फेज 1.

 

रावेत गावात डासांचा प्रादुर्भाव वाढू नये आणि त्या माध्यमातून साथरोगांना निमंत्रण मिळू नये यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. डासांचा प्रादुर्भाव वाढला तर डेंग्यू, चिकन गूनिया, मलेरिया यासारखे आजार डोके वर काढतात. ते होऊ नये यासाठी गावातील प्रत्येक सोसायटी आणि घरोघर धूर फवारणी केली जात आहे. धूर फवारणी यंत्रांच्या सहाय्याने प्रत्येक घर आणि परिसर तसेच खुल्या जागातही फवारणी सुरू आहे. रावेत गावाला साथरोगांपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक सोसायटीने धूर फवारणी करून घ्यावी. दीपक मधुकर भोंडवे : सामाजिक कार्यकर्ते रावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.