Ravet News: पंप हाऊसमधील ‘वॉल्व’ फुटला; शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – रावेत येथील टप्पा 1 पंप हाऊस मधील ‘वॉल्व’ फुटल्याने पंप हाऊसमध्ये पाणी झाले असून इलेक्ट्रिक पॅनेल मध्ये पाणी गेले आहे. त्यामुळे शट डाऊन घेतला असून शहरातील आज (सोमवारी) सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पिंपरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. रावेत येथील टप्पा 1 पंप हाऊसमधील ‘वॉल्व’ फुटला आज फुटला.

त्यामुळे पंप हाऊसमध्ये पाणी झाले. ‘वॉल्व’ बदलण्याचे काम सूरु केले आहे. त्यामुळे अचानक शट डाऊन घ्यावा लागला. सर्व इलेक्ट्रिक पॅनेलमध्ये पाणी गेल्यामुळे सर्व पॅनल पूर्णपणे कोरडे केल्याशिवाय पंप चालू करता येत नाहीत. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

परिणामी संपूर्ण शहरातील आज सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील. रात्रीपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.