Ravet News : ब्रेकअप केले म्हणून प्रियसीला दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – ब्रेकअप केल्याने प्रियकराने तिला फोन (Ravet News) करून व्हाट्सअप मेसेज करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 25 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत घडला.

Pimpri News : घरात गुटखा साठवल्या प्रकरणी पिंपरीत दोघांवर गुन्हा एकाला अटक

याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवदीपसिंग धोत्रा (रा. नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी यांचे रिलेशन होते. तरुणीने आरोपी सोबत ब्रेकअप केले. त्या कारणावरून आरोपीने तरुणीला वारंवार फोन केला. व्हाट्सअप मेसेज पाठवून शिवीगाळ, दमदाटी केली. तरुणीला त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.