Ravet News : ‘अर्बन स्कायलाईन’ स्वप्नपूर्ती करणारा अभूतपूर्व व अविस्मरणीय गृहप्रकल्प – स्वप्नील जोशी

पुण्यातील सर्वात उंच 'अर्बन स्कायलाईन' गृहप्रकल्पाचे भूमीपूजन उत्साहात

एमपीसी न्यूज – रावेतमध्ये उभा राहत असलेला पुण्यातील सर्वात उंच ‘अर्बन स्कायलाईन’ हा स्वप्नपूर्ती करणारा अभूतपूर्व व अविस्मरणीय गृहप्रकल्प आहे. अशी प्रतिक्रिया मराठीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी याने दिली. ‘अर्बन स्कायलाईन’ या बहुप्रतिक्षित गृहप्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ अभिनेता स्वप्नील जोशी याच्या हस्ते आज (शनिवार, दि.27) पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

भूमीपूजन समारंभासाठी माजी महापौर नगरसेवक योगेश बहल, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक संदीप कस्पटे, अर्बन स्कायलाईनचे संचालक अनिल भांगडिया, मोहीत डागा, स्वप्निल शेठ, बिग एफ एम चा आरजे बंड्या, पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन गट्टानी व इतर मान्यवर उपस्थित होते.

अभिनेते स्वप्नील जोशी म्हणाले, ‘घर म्हणजे स्वप्नपूर्ती, आपण घर घेतो तेव्हा आयुष्य सार्थकी लागले याची पोहचपावती मिळते. लोकांना आपण जेव्हा चांगल, उत्तम असे काहीतरी देतो तेव्हा ते भरभरून प्रतिसाद देतात हा आजवरचा अनुभव आहे. आणि याचेच प्रतिक म्हणून आज लॉन्चिंगच्या दिवशी 45 शॉप आणि 212 घरे बुक झाली आहेत ही अविश्वसनीय बाब आहे. 70 प्लस ॲमिनिटज आणि आधुनिक सुविधा देणारा हा पुण्यातील सर्वात उंच गृहप्रकल्प आहे. त्यामुळे ‘अर्बन स्कायलाईन’ हा स्वप्नपूर्ती करणारा अभूतपूर्व व अविस्मरणीय गृहप्रकल्प आहे,’ असे मत अभिनेता स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केले.

अर्बन स्कायलाईनचे संचालक स्वप्निल शेठ ‘अर्बन स्कायलाईन’ गृहप्रकल्पाची माहिती देताना म्हणाले, ‘स्कायलाईनची दुसरी साईट लॉन्च करताना विशेष आनंद होत आहे. या प्रकल्पात आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांचा बारकाईने अभ्यास करून त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना सारख्या आजारानं आपल्याला वैद्यकीय सुविधेचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे गृहप्रकल्पात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आगामी काळात इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर वाढणार आहे, त्यादृष्टीने गृहप्रकल्पात वेईकल चार्जिंग स्टेशन देखील उभारली जाणार आहेत. याशिवाय दोन इनडोअर स्विमिंग पूल, तसेच गृहप्रकल्पासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे असून, विविध 70 ॲमिनिटीज आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.’

‘अर्बन स्कायलाईन’च्या पहिल्या फेजला ग्राहकांनी भरगोस प्रतिसाद दिला, त्यानंतर अर्बन स्पेसने दुसरी फेज लॉन्च केली आहे. 900 फ्लॅट, 70 प्लस अॅमिनिटीज आणि 40 फ्लोअर यासह हा पुण्यातील सर्वात उंच गृहप्रकल्प असणार आहे. 2 ते 6 बीएचके फ्लॅटस् या ठिकाणी उपलब्ध असून, ग्राहकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. बदलता काळ आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून हा गृहप्रकल्प आपले वेगळेपण सिद्ध करत आहे. स्कायलाईपासून पुणे-मुंबई महामार्ग, हिंजवडी आयटी पार्क, प्रसिद्ध शिक्षण संस्था, हॉस्पिटल इत्यादी अगदी जवळच्या अंतरावर आहेत.

‘आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक, लक्झरी लाईफस्टाईल, सुरक्षा निकष, कनेक्टिव्हीटी आणि भविष्याचा विचार या सर्वांचा परिपूर्ण मिलाप म्हणजे ‘अर्बन स्कायलाईन’ हा गृहप्रकल्प आहे,’ अशी प्रतिक्रिया येथे फ्लॅट बुक करणारे ग्राहक देत असून समाधान व्यक्त करत आहेत.

अर्बन स्कायलाईनचे संचालक अनिल भांगडिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिग एफ एम चा आरजे बंड्या याने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.