Ravet News : दीपक भोंडवे यांच्यावतीने रावेतमधील 650 वाहन मालकांना मोफत फास्टॅग

एमपीसीन्यूज : केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने 16 फेब्रुवारी 2021पासून सर्व चार चाकींसह अन्य वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले.  या  बाबत अद्यापही अनभिज्ञ असलेल्या वाहनचालक- मालकांची राज्यातील टोलनाक्यांवर गैरसोय होऊ नये, यासाठी रावेत येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांच्या पुढाकारातून रावेत परिसरात मोफत फास्टॅग नोंदणी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांर्तगत 650  फास्टॅगची मोफत नोंदणी करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होण्यासाठी दि.16 फेब्रुवारीपासून वाहनचालकांना ‘फास्टॅग’ (FASTag) बंधनकारक करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील टोल प्लाझांवर याची अंमलबजावणी सुरु आहे.

मात्र, फास्टॅग नसलेली वाहने फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागत आहे. या बाबत रावेत परिसरातील काही वाहन चालकांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या.

त्यावर भोंडवे यांनी रावेत परिसरात मोफत फास्टॅग नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. भोंडवे यांनी दि. 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीत रावेत भागात भोंडवे कॉर्नर, श्री कृष्ण मंदिर, शिंदे वस्ती कॉर्नर, समीर लॉन्स, बीआरटी रोड, चंद्रभागा कॉर्नर, सेलेस्टीला सोसायटी, सिल्वर ग्रो आणि आदित्य विवाज या ठिकाणी स्वयंसेवकांमार्फत मोफत फास्टॅग नोंदणी सुरू केली.

या नोंदणी प्रक्रियेला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 650 वाहनांसाठी फास्टॅग नोंदणी करण्यात आली.

धनंजय साळुंखे, प्रितेश देव,  संतोष भोंडवे, सुनील भोंडवे, अक्षय भोंडवे, देवेंद्र बोरसे, गोपी पावरा, सुनीत दुराणी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.

रावेत परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सामाजिक सेवेचे व्रत हाती घेतले आहे. त्यानुसार परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. फास्टॅग नोंदणीसाठी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. ही नोंदणी तूर्त थांबविली आहे. तरीही ज्या वाहनचालकांना फास्टॅग नोंदणी करायची असेल त्यांनी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो आदी कागदपत्र घेऊन ‘समीर लॉन्स’ येथे संपर्क साधावा. ही नोंदणी फक्त रावेत येथील रहिवाशांसाठी आहे. दीपक मधुकर भोंडवे : सामाजिक कार्यकर्ते- रावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.