Pimpri : रावेत येथे किडोपिया या प्रिस्कूलचे उत्साहात उदघाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडमधील नव्याने विकसित होणा-या रावेत भागात किडोपिया या प्रिस्कूलचे नुकतेच पालक आणि चिमुकल्यांच्या साथीने उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने लॉन्चिंग झाले. यावेळी सुधाकर बोरसे आणि भालचंद्र पाटील यांच्या हस्ते किडोपियाचे उद्घाटन करण्यात आले.

वाकड आणि बाणेर येथे मागील आठ वर्षांपासून पिनल पाटील या स्मॉल मिरॅकल ग्रुपच्या वतीने सेसिमी स्ट्रीट ही प्रीस्कूल यशस्वीपणे चालवत आहेत. रावेत या भाग आता झपाट्याने विकसित होत आहे. या भागातील लोकांसाठी एक दर्जेदार शिक्षण देणारी प्रीस्कूल सुरु करावी, या उद्देशाने त्यांनी रावेत येथे ही शाळा सुरु केली आहे. या शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी हे वर्ग घेण्यात येणार आहेत. म्हणजेच दोन वर्षापासून ते सहा वर्षापर्यंतची मुले येथे प्रवेश घेऊ शकतात.

  • या शाळेने काही विशेष उद्दिष्टांवर भर दिला असून सध्याच्या काळाला अनुसरुन अशी ही उद्दिष्टे आहेत. येथे मुलांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला असून सीसीटीव्ही, कुशल प्रशिक्षित सुरक्षारक्षक येथे नेमण्यात आले आहेत. तसेच येथील वातावरण आणि सुविधा अत्यंत उत्तम दर्जाच्या आहेत. मुलांसाठी येथे विस्तीर्ण असा मोकळा भाग आहे. जेणेकरुन मुलांना मोकळेपणाने येथे खेळता येईल, विविध उपक्रम करता येतील. येथेच आरोग्यपूर्ण व पौष्टिक आहार देण्याची सोय करण्यात आली आहे.

तसेच सुशिक्षित, गुणवत्तापूर्ण शिक्षकवर्ग आणि आया येथे आहेत. मुलांच्या मानसशास्त्राचा उत्तम अभ्यास असणा-या या शिक्षकांमुळे मुलांच्या निकोप वाढीसाठी मदत होणार आहे. याशिवाय शिकवताना विविध प्रकारची तंत्रज्ञान वापरण्याचा येथे प्रयत्न राहणार आहे. या पंचसूत्रीमुळे मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मोलाची मदत होणार आहे.

  • येत्या एप्रिलमध्ये येथे समर कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच येथे डे केअर अॅक्टिव्हीटी देखील घेण्यात येते. मुलांची शाळा संपल्यानंतर संध्याकाळी सहा ते सात व सात ते आठ या वेळात मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक असे उपक्रम येथे राबवण्यात येणार आहेत. यावर्षी रावेत येथे सुरु करण्यात आलेल्या या शाळेच्या भविष्यकाळात आणखी पाच ते सहा नवीन शाखा सुरु करण्याचा मानस असल्याचे पिनल पाटील, अमित बोरसे आणि प्रियदर्शन पाटील यांनी या शाळेच्या उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विशेषत्वाने सांगितले.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like