Ravet : पादचारी वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पतीसोबत रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना सिलेस्टाईल सिटी फेज एक रावेत येथे घडली.

शशिकला सर्वोत्तम क्षीरसागर (वय 67, रा. सिलेस्टाईल सिटी, फेज एक, रावेत) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर 2019 रोजी ही घटना घडली. सकाळी सातच्या सुमारास शशिकला त्यांच्या पतीसोबत सिलेस्टाईल सिटी या सोसायटीसमोरून रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांचे 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.