PCMC Water News : विद्युत पुरवठा खंडित; शहरातील दोन दिवसांचा पाणीपुरवठा राहणार विस्कळीत

एमपीसी न्यूज – रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील ‘एमएसईडीसीएल’चा फिडर नादुरुस्त झाल्याने विद्युत  पुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग बंद झाले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आज (शनिवारी) दिवसभर आणि उद्या (रविवारी) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची तहान भागविणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, पालिका नागरिकांना पुरेसे आणि दररोज पाणी पुरवठा करण्यात असमर्थ ठरत आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजता ‘एमएसईडीसीएल’चा  फिडर नादुरुस्त झाला आहे. रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्र येथील विद्युत  पुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग  बंद झाले आहे. त्यामुळे, शहरातील आजचा शनिवार  दिवसभराचा तसेच उद्या (रविवार)  रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील.

_MPC_DIR_MPU_II

‘एमएसईडीसीएल’  मार्फत दुरुस्तीचे काम सुरु आहे. विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. नागरिकांनी  उपलब्ध पाणी जपून वापरून  सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.