Ravet : रावेत पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात पोलीस व पोलीस मित्रांची सायकलवरून प्रभात फेरी

एमपीसी न्यूज : पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या सुचनेप्रमाणे शुक्रवारी 12 ऑगस्ट दरम्यान रावेत पोलीस (Ravet) स्टेशन हद्दीतील परिसरात पोलीस व पोलीस मित्रांची सायकलवरून प्रभात फेरी काढण्यात आली.

डी वाय पाटील कॉलेज रोड, इस्कॉन मंदिर, शिंदे वस्ती, जाधव वस्ती, भोंडवे चौक, बी आरटी रोड या मार्गांवरून अशी सायकल रॅली काढण्यात आली होती.

रावेत पोलीस ठाण्याकडील स्टाफ तसेच पोलीस मित्र अधिकारी यांनी एकत्र येऊन भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी भारतीय राष्ट्रध्वज घेऊन रावेत (Ravet) उपनगरात प्रदक्षिणा मार्गाने सायकल वरून प्रभात फेरी काढली होती.
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना संपूर्ण देशभरात अमृतमहोत्सवाचा सोहळा पार पडत आहे. एकात्मकतेचे प्रतिक असलेला भारतीय तिरंगा ध्वज आजपासून 15 ऑगस्टपर्यंत दररोज प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर फडकवावा व एकतेचा संदेश जगाला द्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हे ध्येय साध्य करत असताना नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.