Ravet : स्मशानभूमीच्या विरोधासाठी रावेतच्या नागरिकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक ३२ ‘ए’ मधील जागेवर सीएनजीवर आधारित शवदाहिनी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी ही शवदाहिनी झाल्यास नागरिकांना त्रास होईल. त्य़ामुळे या प्रकल्पास विरोध करण्यासाठी रावेतच्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.

ज्या ठिकाणी स्मशानभूमी सुरु केली जाणार आहे. त्या परिसरात सुमारे सहाशे सदनिका आहेत. त्या ठिकाणी सुमारे दोन ते अडीच हजार नागरिक वास्तव्यास आहेत.

  • २०१५मध्ये या स्मशानभूमीचा ठराव महापालिका सभेत संमत करण्यात आला होता. नागरिकांना मात्र याठिकाणी स्मशानभूमी होणार याची कल्पना नव्हती.

नागरिकांनी या प्रकल्पास कडाडून विरोध केला आहे. या ठिकाणी स्मशानभूमी झाल्यास येथील रहिवाशाच्या आरोग्यांवर त्याचा विपरित परिणाम होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.