Ravet : रावेत येथील आरएमसी प्लॅन्ट बंद करा, शिवसेनेची मागणी

हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे रावेत परिसरातील नागरिक बेजार, महापालिकेला आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला कधी येणार जाग

एमपीसी न्यूज – रावेत येथील सर्वे नंबर 77/ 1,77/ 2 ( चंद्रभागा कॉर्नर जवळील) अनधिकृत आरएमसी प्लॅन्ट त्वरीत बंद करण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस (Ravet) यांनी  पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे.

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस यांनी म्हटले आहे की, रावेत परिसरातील वायू प्रदूषणाची पातळी वाढत आहे. हवेची गुणवत्ता ढासळल्याने नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा अनधिकृत आरएमसी प्लॅन्ट त्वरीत बंद करावा यासाठी  बांधकाम परवानगी विभागाच्या शहर अभियंत्यांना निवेदन दिले आहे.

PCMC : रावेतमध्ये आरएमसी प्लँटमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे. पाण्याची फवारणी केली जात आहे. मात्र, रावेत येथील आरएमसी प्लॅन्टकडे दुर्लक्ष होत आहे. या प्लॅन्टमधून मोठ्या प्रमाणात धूळ बाहेर पडते. वायू प्रदूषण होत आहे. ( Ravet) परिसरातील नागरिकांना श्वसनाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी तरस यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.