Ravet News: इस्कॉनच्या गोविंदधाम मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी

सकाळपासूनच आरती, प्रवचन यासह भगवंतांचा अभिषेक असे विविध कार्यक्रम पार पडले. ; Shri Krishna Janmashtami celebration in the presence of few devotees at ISKCON temple

एमपीसी न्यूज – रावेत येथील इस्कॉनच्या गोविंदधाम मंदिरात आज (दि.12) श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच आरती, प्रवचन यासह भगवंतांचा अभिषेक असे विविध कार्यक्रम पार पडले. कोरोनामुळे यावेळी मोजकेच भाविक उपस्थित होते.

जन्माष्टमी निमित्त मंदिराची सजावट कागदी फुलांनी करण्यात आली होती. तसेच, कागदी प्लेटवर वेगवेगळ्या रंगाचे डिझाइन्स काढून सजावट करण्यात आली होती.

दरवर्षी या कार्यक्रमांमध्ये पन्नास ते साठ हजार लोक सहभागी होत असतात, पण यावर्षी कोरोना सारख्या महामारी मुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, मंदिरात होणारे सर्व विधी हे ऑनलाइन माध्यमातून सर्व भाविकांना दाखविण्यात येत आहेत. भाविकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून मंदिरातील दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

ऑनलाइन दर्शनासाठी खाली लिंकवर क्लिक करू शकता.

https://www.youtube.com/channel/UCZWTGmpa_yK6EoN4BwGKhWQ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.