Ravet : मस्ती की पाठशाळेला वोक्सवॅगन टीमकडून प्रकाश व्यवस्था

एमपीसी न्यूज – रावेत येथे बांधकाम मजुर वस्तीवरील मुलांसाठी सहगामी फाऊंडेशन व रॉबिन हूड आर्मीच्या वतीने ‘मस्ती की पाठशाळा’ चालविण्यात येते. याठिकाणी मुलांना शिकवताना मुख्यत्वे विजेची समस्या येत होती. या समस्येवर उपाय म्हणून वोक्सवॅगन कंपनीच्या प्रोडकशन टिमच्या वतीने सामाजिक उपक्रम फ़ंडातून 3 केव्हीचा सोलर पॅनेल भेट देण्यात आला.

यावेळी डॉ. हेराल्ड मंझेंरिएडर, मिसेस झिंगझिंग, सई संगवाई, रवी नायडू, केदार आपटीकर, अविनाश गोसावी, मृदुल श्रीवास्तव, समीर मुनोत, दिलीप कातकर, अजय कवाडे तर सहगामीच्या प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, रोशनी राय, ज्ञानेश्वर भंडारे, अन्वर मुलाणी, गार्गी नाटेकर, राँबिनहुडचे रवी जयस्वाल, अदिती चव्हाण, लोकेश ढुबंरे, झील पटेल आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. हेराल्ड म्हणाले की, उज्वल देशाचे भविष्य हे मुलांच्या हाती असते आणि ही पिढी घडविण्यात आमचा वाटा होत आहे यात आम्ही समाधानी आहोत. रवी नायडू यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी वोक्सवँगन कंपनीचे व इतर मान्यवर दानशूर व्यक्तींचे अन्वर मुलाणी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.