Ravet : एस बी पाटील कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे  घवघवित यश

एमपीसी न्यूज – रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस बी पाटील  (Ravet ) ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 2023 च्या बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवल्याची भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली.

विज्ञान शाखा – महाविद्यालयात 96.17 टक्के गुण मिळवत आदित्य शेलार याने प्रथम क्रमांक मिळवला. तर प्रशांत थोरवे याने 92.83 टक्के गुण घेत द्वितीय क्रमांक पटकवला. तर खुशी देशमुख 89.67 टक्के गुण मिळवून तृतीय आली.

Alandi : लाखो वारकऱ्यांच्या सोई सुविधां करिता प्रशासन तयारीला

वाणिज्य शाखा – यामध्ये अर्पिता आगरवाल हिने 91 टक्के गुण मिळवून प्रथम आली. हर्षिता दवे ही 90.17 टक्के गुण मिळवून द्वितीय तर सना शेख 89.33 टक्के गुण मिळवून तृतीय आली.

तसेच एकूण विद्यार्थ्यांपैकी  50 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह तर 131 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले.सोबत जेईई मेन्स प्रवेश परिक्षेत आयुष आव्हाड 99.11, देवेश भंगाळे  चैतन्य राणे 91.69, आदित्य शेलार 91.66 या सर्व उत्तीर्ण झाले.

या सर्व  विद्यार्थ्यांचे संस्थेचे  अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पदमा भोसले ,सचिव विठ्ठल काळभोर ,खजिनदार शांताराम गराडे ,सी .ई .ओ गिरीष देसाई तसेच प्राचार्य संदीप पाटील यांनी  आभिनंदन (Ravet ) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.