Ravet : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक आणि विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  कत्तलीसाठी जनावरे विकणाऱ्या (Ravet) आणि त्यांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 14) रात्री दहा वाजता भोंडवे वस्ती, रावेत येथे करण्यात आली.

अन्वर मुनेर सय्यद (वय 30), प्रकाश राजू अमोलिक (वय 21, दोघे रा. नेरेगाव दत्तवाडी, ता. मुळशी), बाळू राजराम तुपे (वय 32, रा. तुपेवस्ती, रावेत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप गावडे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Sangvi : लग्नाच्या आमिषाने व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंडवे वस्ती रावेत येथून रावेत पोलिसांना मदतीसाठी कॉल आला. त्यानुसार फिर्यादी आणि त्यांचे सहकारी भोंडवे वस्ती येथे गेले. त्यावेळी एका टेम्पोमध्ये तीन जनावरे आढळली. ही जनावरे आरोपी अन्वर आणि प्रकाश यांनी बाळू तुपे याच्याकडून खरेदी केली असून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी 40 हजारांची तीन जनावरे आणि पाच लाखांचा टेम्पो जप्त केला आहे. रावेत पोलीस तपास करीत (Ravet) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.