Ravet : सोसायटी कंपाऊंडमधून जनसेटच्या बॅटरी चोरून नेणाऱ्या तीन महिलांना अटक

एमपीसी न्यूज – सोसायटी कंपाऊंडमधून जनसेटच्या (Ravet) दोन बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या तीन महिलांना रावेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हा प्रकार बुधवारी (दि.22) सकाळी पुनावळे य़ेथील साई पॅराडाईज सोसायटी येथे घडत होता. याप्रकरणी प्रशांत सुधाकर राणे (वय 33 रा.मुळशी) यांनी फिर्यादी दिली असून तीन महिलांना याप्रकऱणी अटक करण्यात आली आहे.
Pimpri News: अण्णासाहेबांचे माथाडी कामगारांसाठीचे कार्य दीपस्तंभासारखे – इरफान सय्यद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई पॅराडाईज या सोसायटीच्या आवारात लावण्यात आलेल्या जनसेटचे कंपाऊडमध्ये प्रवेश करत आरोपी महिला 200 के.व्ही जनसेटच्या दरवाज्याचे लॉक तोडून त्यामधील 30 हजार रुपयांच्या 12 व्होल्टच्या दोन बॅटरी चोरून नेत होत्या. मात्र, त्यांना रंगेहोत पकडत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याचा पुढील तपास रावेत पोलीस करत आहेत.