Ravet : रावेत बंधाऱ्यात पडून महिलेचा मृत्यू

Ravet: Woman dies after drowning in Ravet dam

एमपीसी न्यूज – रावेत येथील पवना नदीवरील बंधाऱ्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली.

सारीका संजय शिंदे वय (वय 35) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अग्निशमन विभागाला माहिती मिळाली की, रावेत येथील बंधाऱ्यात एक महिला पडली आहे. त्यानुसार प्राधिकरण उपविभागाचे सब ऑफिसर अशोक कानडे, लिडिंग फायरमन प्रदिप कांबळे, वाहनचालक परशुराम इसवे, सिनिअर फायरमन सांरग मगंरुळकर, फायरमन विकास बोंगाळे, अंकुश बडे, ट्रेनी सब ॲफिसर विजय इंगळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक गावकऱ्यांनी अग्निशमन विभागाच्या जवानांना सांगितले की, मयत सारिका शिंदे यांना फीट येत होते. त्यामुळे त्या पाण्यात पडून बुडाल्या. जवानांनी गळांच्या मदतीने बंधाऱ्यात शोध मोहीम राबवून मृतदेह शोधला. त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या मदतीने उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1