BNR-HDR-TOP-Mobile

Ravet : विमेन्स हेल्पलाईन फौंऊडेशनतर्फे दिवाळीनिमित्त रावेत येथे शुक्रवारपासून ‘शॉपिंग एक्स्पो’

एमपीसी न्यूज – विमेन्स हेल्पलाईन फौंऊडेशनतर्फे दिवाळीनिमित्त तीन दिवसीय शॉपिंग एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे, अशी माहिती फौंऊडेशनच्या अध्यक्षा निता परदेशी यांनी दिली आहे.

रावेतमधील आंबेडकर चौक, आठवडा बाजार येथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन शुक्रवार (दि. 18), शनिवार (दि. 19) आणि रविवार (दि. 20 ऑक्टोबर) दरम्यान भरवण्यात येणार आहे. शहरातील गरजू ,पीडित महिलासाठी विमेन्स हेल्पलाईन फौंऊडेशन काम करत आहे. या प्रदर्शनासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे विमेन्स हेल्पलाईन फौंऊडेशनतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

शॉपिंग एक्स्पोमध्ये 40 महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. खाद्यपदार्थ, पुस्तके, शोभेच्या वस्तू, खेळणी, संसारोपयोगी वस्तूचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत विनामूल्य खुले असणार आहे. अधिक माहिती आणि स्टॉल बुकिंगसाठी दीपाली येवले यांच्याशी ९७३००६७६५१ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे संयोजन शैलजा गुरव, निता परदेशी , निला राजगुरू , सुनीता काने , सोनाली गिरी यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.