Ravi Sharma Death : गणेश चरणी भजनात तल्लीन असलेल्या कलाकाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : ओठी भगवतांचे नाम असतानाच कलाकाराला भर मंडपात (Ravi Sharma Death) मृत्यू आला. मैनपुरीमधील बंशीगोहरा येथे एका कलाकाराने देवाची लीला करताना आपला शेवटचा श्वास घेतला.

गणेशोत्सव निमित्ताने बंशीगोहरा येथे गणेश मंडपात हनुमानाची लीला सुरु होती. कलाकार रवी शर्मा हे लीला सादर करत होते. भक्त त्यांची हि कला उत्सुकताने पाहत होते. त्याच वेळी रवी शर्मा यांना अस्वस्थ वाटू लागले, आणि ते जमिनीवर कोसळले. जमलेल्या प्रेक्षकांना वाटले, कि ते त्यांची लीला करत आहेत.

पण, बराच वेळ ते उठले नाहीत म्हणून त्यांना पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत होते. म्हणून तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा भगवंतांच्या नामात तल्लीन असतानाच मृत्यू झाल्याचा (Ravi Sharma Death) व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Ganpati Visarjan Parking : पुण्यात विसर्जन मिरवणूक पहायला येताय…. मग येथे करा पार्कींग

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.