Pune crime news: फरार घोषित करून 17 दिवस उलटले तरीही रवींद्र बऱ्हाटे पोलिसांना सापडेना

Ravindra Barhate was not found by the police even after 17 days of being declared absconding.

एमपीसी न्यूज – बेकायदा सावकारी, आर्थिक फसवणूक, खंडणी आणि धमकावणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे याच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.

त्यानंतर ही बऱ्हाटे पोलिसांना सापडत नसल्यामुळे अखेर त्याला फरार घोषित करण्यात आले. फरार घोषित केल्यानंतर 17 दिवसांचा कालावधी लोटला असून रवींद्र बऱ्हाटे अद्यापही पुणे पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे तो गेला तरी कुठे असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रविंद्र बऱ्हाटे शी संबंधित असणार्‍यांवर छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान पोलिसांना शेकडो फाइल्स सापडल्या आहेत. या फाइल्स राजकारणी व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक,  हॉटेल व्यावसायिक, शासकीय ठेकेदार यांच्याशी संबंधित आहेत. याशिवाय कुलमुखत्यार पत्रे, खरेदीपत्र, करारनामे, भागीदारी पत्रे आणि इतर दस्तऐवजाचा समावेश आहे.

रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारा विरोधात पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आठहून अधिक गुन्हे दाखल आहेत. कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून रवींद्र बऱ्हाटे हा फरार झाला आहे. कोथरूड पोलिसांनी त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.