Vadgaon Maval News : वृक्ष व शालेय साहित्य स्विकारत रविंद्र भेगडे यांनी वाढदिवस केला साजरा.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या वाढदिवसाला कोणीही कोणत्याही प्रकारची भेटवस्तू , पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ न आणता वृक्ष व शालेय साहित्य आणावे, त्या साहित्याचे वाटप गरजु विद्यार्थ्यांना करून तालुक्यातील विविध भागात वृक्ष लागवड करून माझा वाढदिवस मी अत्यंत साधेपणाने साजरा करणार असल्याचे मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रविंद्र आण्णासाहेब भेगडे यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केले होते.

त्याच आवाहनाला प्रतिसात देत कार्यकर्त्यांकडून रविंद्र अप्पा भेगडे यांना शुभेच्छा म्हणून खूप मोट्या प्रमाणात वृक्ष व वह्या जमा झाल्या व  येत्या काही दिवसामध्ये शालेय साहित्य तालुक्यातील गरजु विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणार आहोत व वृक्षांचे काही ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत.

याशिवाय 21 ते 23 जुलै या दिवशी झालेल्या अतिवृष्टीत मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले.यामध्ये तुंगी येथील लक्ष्मण म्हस्कर यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले होते त्यांना तत्काळ मदत म्हणून रविंद्र भेगडे यांनी आर्थिक मदत केली.

यावेळी रविंद्र आप्पा भेगडे यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्कर अप्पा म्हाळस्कर, मावळ पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे,उपसभापती दत्तात्रय शेवाळे,माजी सभापती गुलाब म्हाळसकर,गणेश गायकवाड,प्रशांत ढोरे,पांडुरंग ठाकर, माजी उपसभापती शांताराम कदम,सरचिटणीस सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी,महिला आघाडी अध्यक्ष सायली बोत्रे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड उपाध्यक्ष रघुवीर शेलार,नगरसेवक अमोल शेटे,बाळासाहेब घोटकुले,प्रदीप धामणकर,देविदास गायकवाड, अमोल भेगडे,नामदेव वारींगे,विकास लिंभोरे, सागर शिंदे ,नामदेव शेडगे,हरिभाऊ दळवी,व तालुक्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.