Lonavala : महिला भगिनींच्या आशीर्वादाने मिळतंय लढायचं बळ – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज – गावभेट दरम्यान गावोगावी महिला भगिनींचे मिळणारे आशीर्वाद मला त्यांच्या न्याय व हक्काच्या लढाईत अन्यायाला, रखडलेल्या विकासाला पराभूत करण्याचे आशिर्वाद व बळ मिळत असल्याचा आशावाद मावळ प्रबोधनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांनी नाणे मावळात व्यक्त केले.

यावेळी महिला भगिनींशी बोलताना भेगडे म्हणाले, आपल्या खंबीर पाठिंब्याच्या बळावर आता मावळ तालुक्यात नक्कीच बदल घडेल व एका नव्या पर्वाचा उदय होईल. हे पर्व आपल्या विकासाचं, प्रगतीचं व सर्वांच्या उज्ज्वल भविष्याचं असेल असे सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिस्टर क्लिन चेहरा म्हणू रवींद्र भेगडे यांनी गावभेटीचा दौरा सुरु केला आहे.

आंदर मावळातील दौर्‍याला महिला भगीनींचे जे आशीर्वाद व साथ मिळाली तीच नाणे मावळात मिळत आहे. या माता भगिनींना न्याय मिळवून देण्याकरिता, तरुणांना रोजगार व मावळाला विकासाची दिशा देण्याला माझे प्राधान्य राहिल, असे सांगत त्यांनी हा दौरा व मिळणारा प्रतिसाद ही उद्याच्या बदलाची नांदी असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे व मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like