Ravindra Jadeja Controversy: मास्क न घालता बाहेर पडलेल्या जडेजाची महिला पोलीसाबरोबर हुज्जत

एमपीसी न्यूज – टीम इंडियाचा ऑल-राउंडर रवींद्र जडेजा वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो मात्र, जडेजा आता नवीनच वादात सापडला आहे. जडेजा आपली पत्नी रिवाबा हिच्या सोबत ड्राईव्हसाठी बाहेर पडला त्यावेळी मास्कवरून रविंद्र जडेजाने ड्यूटीवर असलेल्या महिला पोलीसांबरोबर हुज्जत घातली. 

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्तानुसार, जडेजा सोमवारी (दि.10) रात्री गाडी चालवत असताना मास्क न घातल्याबद्दल एका महिला कॉन्स्टेबल यांनी त्याला मास्क का घातला नाही या बद्दल विचारणा केली. मास्क न घातल्यामुळे दंड भरण्यासाठी या महिला पोलीसांने सांगितले असता दोघात वाद झाला असल्याचे या वृत्तात म्हंटले आहे.

हि घटना सोमवारी रात्री नऊ वाजता राजकोट येथील किसन्पारा चौक येथे घडली. सोनल गोसाई असे या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. या कॉन्स्टेबलने जडेजाला गाडीचा परवानाही मागितला. त्याची पत्नीने मास्क घातला होता का नाही याबाबत काही माहिती समोर आली नाही. उद्धट वागणुक केल्या बद्दल  जडेजा विरोधात महिला पोलीसांने तक्रार केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.