Rawet: अजित पवारांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

एमपीसी न्यूज – नव्या जुन्या कार्यकर्त्यांची मूठ बांधून सर्वाना समान सन्मान आणि वागणूक दिली जाईल. भाजपने केलेल्या भ्रम निराश आणि वाढत्या बेरोजगारी यावर युवा खासदार हाच उपाय आहे. सर्वानी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार ह्यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, असे आवाहन आज अजित पवार यांनी पिंपरीत केले.

रावेत येथे आज काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सुमारे दीड तास संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष निगारबारस्कर,काँग्रेस एनएसयुआयचे मनोज कांबळे, पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल, पिंपरी युथ काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड काँग्रेस एनएसयुआय शहराध्यक्ष वसीम इनामदार, निखिल भोईर काँग्रेस प्रदेश एनएसयुआय माजी महासचिव, माजी नगरसेवक अर्जुन ठाकरे, युवा कवी आयुष मंगल, विश्वास गजरमल, अभिमन्यू दहींतूल्ले, दिलीपसिंग मोहिते, प्रवीण शेट्टी, अख्तर चौधरी, अमर नाणेकर, राजन पिल्ले, दीपक थोरात, अशोक काळभोर, उमेश बनसोडे, दिलीप पंढरकर, संदेश नवले, आबा खराडे, हिरा जाधव, नासिर चौधरी, करणसिंग गिल, शाहरुख खान, किशोर खंडागळे, विवेक जगताप, शरद जाधव, बंटी साळुंके, अर्जुन गायकवाड, मेहबूब शेख, रोहन वाघमारे, नितीन खोजेकर, सुरज भोईर, बाबासाहेब मडगे आणि असंख्य कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

यावेळी पवार पुढे म्हणाले, पूर्वी झालेला इतिहास पाहता चुकांची पुनरावृत्ती न होता नव्याने कामाला लागा. येणा-या निवडणुकीच्या काळात एकदिलाने काम करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.