Pimpri News : रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज : 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस, भारतात संविधानाची अमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरु झाली देशात सर्व जाती धर्माचे लोक एकात्मतेने राहू लागले. आज भारत देश हा उन्नतीकडे जात आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे भारताचे संविधान आणि संविधानाने दिलेली लोकशाही यांचा अभिमान बाळगत (Pimpri News) रयत विद्यार्थी विचार मंच च्या वतीने पिंपरी येथील संस्थेच्या संपर्क कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक मा. सावन वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक मा. सावन वाघमारे साहेब यांनी असे मत व्यक्त केले कि यांनी असे मत व्यक्त केले कि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले व आज सर्वानी याच संविधानाचे  काटेकोरपणे पालन केले पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःच्या व देशाच्या प्रगतीचा मार्ग निश्चित करू शकतो.तसेच रयत विद्यार्थी विचार मंच गरीब गरजू,वंचित विद्यार्थ्यांसाठी करत असलेले शैक्षणिक कार्य फार उल्लेखनीय आहे.

PCMC : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चेत’ महापालिका विद्यार्थ्यांचा सहभाग

संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून  यावेळी उपस्थितांचे आभार मानले. पोलीस उपनिरीक्षक सावन वाघमारे साहेब यांना शॉल व भारतीय संविधानाची प्रास्ताविका देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे पदाधिकारी धम्मराज साळवे,संतोष शिंदे,नीरज भालेराव,रोहित कांबळे,संदेश पिसाळ, श्वेता ओव्हाळ,भाग्यश्री आखाडे,प्रणाली कावरे,(Pimpri News) स्नेहल म्हसकर,महेश गायकवाड,मयूर जगताप, योगेश कांबळे,समाधान गायकवाड,निलेश आठवले,राहुल थोरात इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.