RBI : दोन हजाराच्या 50 % नोटा मुदतपूर्वीच बँकेत जमा

एमपीसी न्यूज – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (RBI) गुरुवारी (दि. 8) माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आरबीआयद्वारे गेल्या महिन्यात सर्वोच्च मूल्याचे चलन नागरिकांना परत देण्याची सूचना केल्यानंतर दोन हजारच्या साधारण 50% नोटा बँकिंग प्रणालीत परतल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 31 मार्च पर्यंत साधारण 3.62 लाख कोटी मूल्य असलेल्या दोन हजारच्या नोटा वापरात होत्या व घोषणेनंतर 1.80 लाख कोटी मूल्य असलेल्या दोन हजारच्या नोटा परतल्या आहेत. साधारण 85 % नोटा बँकांमध्ये डिपॉजिटद्वारे येतील अशी अपेक्षा आहे.

आरबीआयने 19 मे रोजी चलन व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून नागरिकांना  दोन हजारच्या नोटा परत देण्याची मागणी केली होती. एकावेळी फक्त वीस हजार मूल्य असलेल्या नोटा बदलून घेण्याची परवानगी होती. नोटा बदलण्याची मर्यादा 30 सप्टेंबर पर्यंत असून लोकांनी न घाबरून बँकांमध्ये गर्दी टाळावी व शेवटच्या क्षणापर्यंत ही गोष्ट सोडू नये असे आव्हान आरबीआयच्या गव्हर्नरनी केले होते.

आरबीआयने 500 रुपयांचा नोटा चालनातून काढणार नाहीत व हजार (RBI) रुपयांचा नोटा परत चलनात येणार नाही असे आश्वासन देत लोकांना दिलासा दिला. आरबीआय गव्हर्नर हे देखील म्हणाले की दोन हजार रुपयांचा बहुतांश नोटा 30 सेप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत जमा होतील असा आरबीआयचा अंदाज आहे.

Alandi : कीर्तन व प्रवचन प्रशिक्षण शिबिराच्या सांगता कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.