RBI Governor Press Conference: कोरोना संकटामुळे कर्जाचे हप्ते न भरण्याच्या सवलतीस आणखी तीन महिने मुदतवाढ

RBI Governor Press Conference: extended moratorium for another three months due to the financial crisis amid coronavirus

0

एमपीसी न्यूज – कोरोना महामारी व लॉकडाऊन यामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच अडचणीत आल्याचे सांगत यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहेत. लॉकडाऊनमुळे देशातील जनता आर्थिक संकटात असल्याने बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्ते न भरण्यासाठी देण्यात आलेली परवानगी आणखी तीन महिन्यांनी वाढविण्याची महत्त्वाची घोषणा भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली आहे. कर्जाचे हप्ते न भरण्यासाठी यापूर्वी रिझर्व बँकेने दिलेली सवलत 31 मे रोजी संपत आहे. त्याला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने देशातील कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत वरील घोषणा केली. कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) शून्याच्याही खाली राहण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. बाजारातील मागणी 60 टक्क्यांनी कमी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रेपो रेटमध्ये 40 पॉईंट्सची कपात करून तो 4.4 वरून 4 करण्यात आल्याची आणखी एक महत्त्वाची घोषणा शक्तीकांत दास यांनी केली. त्यामुळे कर्जावरील व्याजही कमी होणार आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थेला थोडाफार आधार मिळू शकणार आहे. निर्यातदारांना दिलासा देणारे काही निर्णयही शक्तीकांत दास यांनी यावेळी जाहीर केले.

देशाच्या बाजारपेठेतील उलाढाल वाढावी, आयात-निर्यातीला पाठबळ मिळावे, लोकांवरील आर्थिक ताण कमी करणे तसेच जास्तीत जास्त खेळते भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी रिझर्व बँक उपाययोजना करीत असल्याचे शक्तीकांत दास यांनी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like