-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune news : राष्ट्रवादी कार्यालयाच्या उदघाटनाची गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी : जगदीश मुळीक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोळा केलेली गर्दी ही पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी आहे. जगताप भानावर आले असतील तर त्यांनी पुणेकरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोळा केलेली गर्दी मोठी होती. त्यावर शहरभर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजीही व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुळीक यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जगताप यांच्यावर निशाणा साधला.

मुळीक म्हणाले,  कोरोनाच्या सर्व नियमांची पायमल्ली करीत जगताप यांनी केलेली गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या  लाटेला आमंत्रित करणारी आणि पुणेकरांच्या जीवाशी खेळणारी आहे.

एकीकडे शेकडो वर्षांची शिस्तबध्द परंपरा  असणाऱ्या वारकरी संप्रदायाला पायी पालखीसाठी परवानगी नाकारणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचे प्रदर्शन करणे बेजबादारपणाचे आहे. असे आयोजन टाळायला हवे होते. यांच्या चमकोगिरीमुळे खुद्द अजित दादांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

कोरोनाचे संकट अद्याप टळलेलं नाही. प्रत्येक पुणेकर कोरोना विरोधात लढत असताना, पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा बालिश प्रकार जगताप यांनी केला आहे. जगताप भानावर आले असतील तर त्यांनी पुणेकरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn