Pimpri : फेरीवाला कायद्यासाठी लढण्यास सज्ज रहा – शक्तिमान घोष 

एमपीसी न्यूज – भारताच्या  संसदेने सन २०१४ मध्ये फेरीवाला कायदा मंजूर केला, ही समधानाची बाब असली तरीही देशातील परिस्थिती पाहता  त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी केंद्र, राज्य शासन व महापालिका स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी सर्व फेरीवाले यांनी सज्ज रहावे, असे आवाहन नॅशनल हॉकर्स फेडरेशन इंडियाचे राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष नुकतेच आज केले.

नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आयोजित आज चिंचवड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झारखंडच्या अनिता दास, युवा सचिव वर्मा, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते,  प्र. संघटक अनिल  बारावकर, राजू बिराजदार, इरफान चौधरी, महिला उपाध्यक्ष वृषाली पाटणे, मनिषा राउत, मधुकर वाघ, माधुरी जलमूलवार, सुरेश देडे, विजय सूर्यवंशी, किरण सादेकर, पोपट सकट, शशिकला ढवळे, विट्ठल कड, अम्बालाल सुखवाल, सैफल शेख आदी उपस्थित होते.

पुढे घोष म्हणाले “देशाची अर्थव्यस्था ढासळत  आहे, फेरीवाला हा स्वंयरोजगार निर्मिती करणारा घटक असल्याने अर्थव्यवस्थेत महत्वाचे स्थान असणारा हा आज उपेक्षित आहे. भारतीय घटनेच्या आधाराने कायदा व्हावा म्हणून फेडरेशनने देशव्यापी लढा उभारला. यामुळे कायदा झाला,  प्रत्येक राज्याची जबाबदारी असताना काही राज्ये वगळली तर अपेक्षित काम  होताना दिसत नाही. याचा अर्थ शासन उदासीन आहे. हे स्पष्ट होत आहे. एकिकडे स्मार्ट  सिटीच्या नावाने करोडो रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे. तर शहरात राहणा-या गरिबांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे. अनिता दास यांनी झारखंड व रांची येथे केलेल्या प्रयत्नातून उभा राहिलेल्या हॉकर्स झोनची माहिती दिली. तर संदीप वर्मा यांनी  हॉकर्सचे प्रश्न सोडवण्यासाठी मध्यवर्ती समितीची कल्पना मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.