Pune News : खऱ्या आयुष्यातील ज्योतिषी जयंत कुलकर्णी मराठी मालिकेत देखील ज्योतिषाच्या भूमिकेत 

एमपीसी न्यूज : ज्योतिषी व वास्तू सल्लागार जयंत कुलकर्णी यांनी झी मराठी या चॅनेल वरील मराठी मालिकेत ” येऊ कशी तशी मी नांदायला” या मध्ये ज्योतिषाची भूमिका साकारली आहे. 

पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध ज्योतिषी व वास्तू सल्लागार जयंत कुलकर्णी यांनी ज्योतिष व वास्तुशास्त्र याच प्रमाणे अभिनयाची ही आवड जपली आहे. यापूर्वी देखील त्यांनी सिरीयलमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. परंतु ज्योतिषांची भूमिका त्यांनी पहिल्यांदाच साकारली आहे. मराठी मालिका ‘येऊ कशी मी नांदायला’चे शूटिंग सध्या ठाण्यात सुरु आहे.

याबाबत कुलकर्णी म्हणाले,  पण ऐन तारुण्यात काही ॲक्टर बनायचे योग नव्हते. त्यामुळे या क्षेत्रात इच्छा असूनही काही करता आले नाही. परंतु तो ऍक्टर होण्याचाएक किडा असतो तो अजूनही जिवंत होता. अर्थात त्याला हेतुपुरस्सर जिवंत ठेवला होता. त्यामुळे प्रबळ इच्छा असली की मार्ग निघतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.