Maharashtra Political Crisis : बंडखोर मंत्र्यांची खाती दिली अन्य मंत्र्यांना

एमपीसी न्यूज – राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटात सामिल झालेल्या (Maharashtra Political Crisis) बंडखोर मंत्र्यांना मोठा धक्का दिला आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्यासह पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांची खाती काढून त्याचे फेरवाटप करण्यात आले आहे. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरु राहण्यासाठी तसेच सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागाची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे.

Pune Suicide Case : पत्नीचे अनैतिक संबंध समजल्यानंतर पतीची आत्महत्या

 

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6 – अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांना आपल्या अनुपस्थितीची सर्व किंवा त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देश देता येईल, अशी करतूद आहे,त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला.

 

 

मंत्र्यांकडील खातेवाटपात बदल

शंभूराज देसाई यांच्याकडील खाती संजय बनसोडे राज्यमंत्री (गृह निर्माण), विश्वजित कदम राज्यमंत्री (वित्त, नियोजन,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन),सतेज ऊर्फ बंटी पाटील राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन), राजेंद्र पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती विश्वजित कदम राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण व वस्त्रोद्योग), आदिती तटकरे राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य), (Maharashtra Political Crisis)  अब्दुल सत्तार राज्यमंत्री यांच्याकडील खाती प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री (महसूल), सतेज पाटील राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती तटकरे राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

 

बच्चू कडू राज्यमंत्री यांच्याकडील खाती आदिती तटकरे राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज पाटील राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बनसोडे राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय भरणे राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.