Chinchwad : बंडखोराचा आणि शिवसेनेचा काडीचा संबंध नाही – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज –  शिवसेना कदापी गद्दारी करणार नाही. शिवसेना उघड करते. भाजपसोबत युती मनापासून झाली आहे. मुंह मे राम और बगल मै छुरी असे शिवसेनेचे काम नाही. त्यामुळे चिंचवडच्या बंडखोराचा आणि शिवसेनेचा काडीचा संबंध नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) ठणकावून सांगितले.

शिवसेना-भाजप महायुतीचे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथे आयोजित केलेल्या सभेत ठाकरे बोलत होते.

चिंचवड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहूल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. याबाबत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी ही बाब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले.

त्यानंतर ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, भाजपबरोबरच्या शिवसेनेच्या सर्व कुरबुरी संपल्या आहेत. शिवसेना जे काही करते ते उघड-उघड करते. आमच्याकडून कदापी गद्दारी होणार नाही. मुंह मे राम और बगल मै छुरी असे शिवसेनेचे काम नाही. त्यामुळे चिंचवडच्या बंडखोराचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.