Pune News : टिळक रोडवरील प्रसिद्ध डॉक्टरकडून रिसेप्शनीष्ट महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज : पुण्यातील टिळक रस्त्यावर एका प्रसिद्ध क्लिनिकच्या डॉक्टरने रुग्णालयातील रिसेप्शनीष्ट महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

स्वारगेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, फिर्यादी या टिळक रस्त्यावरील एका क्लिनिकमध्ये रिसेप्शनष्ट म्हणून काम करतात. 22 मे रोजी त्या रुग्णालयात साफसफाई करीत असताना आरोपी डॉक्टरने पाठीमागून येऊन फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल अशा रीतीने पकडले. या कृत्यानंतर पीडित महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.