Chinchwad : चिंचवडेनगर येथे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून आज प्रभाग क्रमांक १७ मधील चिंचवडे नगर आणि वाल्हेकरवाडी परिसरातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.

रोख रक्कम, शालेय बॅग व अभिनंदनपर संदेश पत्र असे बक्षीसचे स्वरूप होते. लक्ष्मण जगताप युवा मंच वाल्हेकरवाडी व नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे, आणि सचिन शिवले यांच्या कार्यालयात नोंद केलेल्या विद्यार्थ्यांना आज समारंभ पूर्वक बक्षीसाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका करुणा चिंचवडे, शेखर बबनराव चिंचवडे, बिभिषण चौधरी,  ज्येष्ठ मार्गदर्शक पोपट शिवले, मार्गदर्शक नाना शिवले, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे राजेंद्र चिंचवडे, पाटीलबुवा चिंचवडे युवा नेते सचिन शिवले, संदीप शिवले, वाल्मिक शिवले, दिलीप गडदे,  हेमंत ननावरे,  कमलाकर गोसावी, सागर भोंडवे, पप्पू चिंचवडे, विक्रम फंड, अशोक सूर्य, समीर शिवले आदी मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.