Lonavala : स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत गुणवंत कामगार व घंटागाडी चालकांचा सत्कार

लोणावळा नगरपरिषदेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेने स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत गुणवंत कामगार (Best performing worker) वाहनचालक स्‍पर्धा आयोजित केली. यामध्‍ये घरोघरी कचरा गोळा करणारे कर्मचारी, सार्वजनिक शौचालय, सफाई कर्मचारी, रस्‍ते सफाई कर्मचा-यांचा समावेश करण्यात आला.
यामध्‍ये कामावरील हजेरी, आरोग्‍यविषयक काळजी, कामाची प्रभाविकता, काम करताना व नागरिकांमध्‍ये मिसळतानाचा स्‍वभाव इ. बाबींचा विचार करून 100 मार्क देण्याचे ठरविण्यात आले. त्‍यानुसार प्रत्‍येक महिन्‍याला गुणवंत कर्मचारी घोषित करून त्‍यांना प्रशस्‍तीपत्रक व सन्‍मानचिन्‍ह देणार असल्‍याचे नगराध्‍यक्षा सुरेखा जाधव व मुख्‍याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

एप्रिल ते जून 2019 या पहिल्‍या त्रैमासिकमधील जून महिन्‍यात राघू भालेराव व लियाकत शेख, जुलै ते सप्‍टेंबर 2019 या
दुस-या त्रैमासिक मधील ऑगस्‍ट 2019 महिन्‍यात संगीता रोकडे व रुपचंद राणवे यांना सन्‍मानित करणेत आले. तसेच घरोघरी कचरा गोळा करणा-या कर्मचा-यांमधून या कामाचे ठेकेदार आदर्श सर्विसेस यांनी उत्‍कृष्‍ट ड्रायव्‍हर म्‍हणून आकाश वाडेकर, आनंद वाघ, इक्‍बाल शेख, मनोज तुपे यांना सन्‍मानित केले. तसेच सार्वजनिक शौचालय सफाई कर्मचारी म्‍हणून या कामाचे ठेकेदार सेवा फाऊंडेशन यांनी राजेश शहा, दयानंद शहा यांना सन्‍मानित केले.
तसेच उत्‍कृष्‍ट रॅगपिकर्समधून लोणावळा नगरपरिषदेने बाबू शेख यांना सन्‍मानित केले. तसेच माहे डिसेंबर 2019 या महिन्‍याकरिता उत्‍कृष्‍ट ड्रायव्‍हर म्‍हणून संजय गुजर यांना तर उत्‍कृष्‍ट डि स्‍लजीग ऑपरेटर म्‍हणून नरेश साळवे, सचिन सावंत यांना गौरविण्‍यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.