Pimpri News : खेळाडूंमुळे शहराला क्रीडानगरी म्हणून ओळख : महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला कामगारनगरी म्हणून ओळखले जाते. या शहरातील खेळाडू आपल्या योगदानातून या नगरीला क्रीडानगरी म्हणून देखील ओळख प्राप्त करून देत आहेत.  या खेळाडूंचे योगदान उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले. 

महापालिकेच्या वतीने पूर्व राष्ट्रीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार  महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.  महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती  अॅड. नितीन लांडगे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसदस्या अपर्णा डोके, मीनल यादव, नगरसदस्य मोरेश्वर भोंडवे, अंबरनाथ कांबळे, तुषार हिंगे, प्रविण भालेकर, राजू बनसोडे, शैलेश मोरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उप आयुक्त संदीप खोत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते.

सत्कार म्हणजे एक ओझे असते त्यातून उतरायी होण्यासाठी आपले कसब पणाला लागत असते असे नमूद करून महापौर ढोरे म्हणाल्या, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करणा-या खेळाडूंनी इतर खेळाडूंसमोर आदर्श निर्माण केला आहे.  शहरातील खेळाडूंना सरावासाठी महापालिका जागा उपलब्ध करुन देण्याबरोबरच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देईल.  या सुविधांचा उपयोग करुन खेळाडूंनी कसून सराव करुन यश संपादन करावे आणि शहराच्या नावलौकिकात भर घालावी.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, खेळाडूंनी मिळविलेले यश अभिमानास्पद आहे.  या खेळाडूंच्या सत्कारामुळे इतर खेळाडूदेखील प्रोत्साहित होत असतात. विरोधी पक्षनेता राजू मिसाळ म्हणाले, खेळाडूंना नजीकच्या ठिकाणी प्रशिक्षण आणि सरावासाठी जागा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन करावे. स्थायी समिती सभापती लांडगे म्हणाले, खेळाडूच्या नैपुण्याने शहराच्या नावलौकिकात भर पडते.

सत्कारार्थींमध्ये अक्षय घुबे, ओम पोखरकर, आदित्य सगळे, हर्षद घोडनविकर, पृथ्वीराज देशमुख, साजिरी वेदपाठक, रेणूका भोसले, रुपाली पाटील, अंकिता गवारे, विश्वजीत सुरळीकर, राजनंदीनी यादव या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षक अरुण पाडुळे, समिता गोरे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा समिती सभापती उत्तम केंदळे यांनी केले.  सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.