Pune News : आरटीई अंतर्गत दहावी पर्यंत विनामूल्य शिक्षण देण्याची शिफारस

एमपीसी न्यूज – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दहावी पर्यंत विनामूल्य शिक्षण देण्याची मुख्य सभेच्या मार्फत केंद्र सरकारला शिफारस करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, आरटीईअंतर्गत शहरातील शाळांमध्ये 25 टक्के जागा दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांसाठी राखीव असतात. या विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. सर्वसामान्य कुटुंबातील गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणे आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नाही. त्यामुळे या नियमात बदल करावा यासाठी केंद्र सरकारकडे मुख्य सभेची मान्यता घेऊन शिफारस करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.