Pimpri News : स्टार्टअपला चालना देण्यासाठी स्मार्ट सिटी इनक्युबेशन सेंटर आणि डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट यांच्यात सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लि. अंतर्गत असलेल्या पीसीएमसी स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी यांच्यात शहरातील स्टार्टअपला चालना देण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. मंगळवारी (दि. 21) या करारावर पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा स्मार्ट सिटी लि. चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, डॉ. डी.वाय.पाटील इन्टीटयूटचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वाक्ष-या केल्या.

याप्रसंगी, ऑटो क्लस्टरचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण वैद्य, डॉ. भावना अंबुडकर, इक्युबेशन विभाग प्रमुख उदय देव, महूवा भौमिक आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील सुक्ष्म-लघु उद्योजकांसाठी ऑटो क्लस्टर स्थापन करण्यात आले आहे. आतापर्यंत 3 ते 4 हजार सुक्ष्म व लघु उद्योजकांनी त्याचा लाभ घेतला. इनक्युबेशन सेंटरसाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून 5 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या या सेंटरच्या माध्यमातून नवीन स्टार्टअपला चालना व चांगल्या सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने स्टार्टअप बॅच देखील सूरू आहे.  तसेच त्यांच्यामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येते.

डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी यांच्यासोबत झालेला हा सामंजस्य करार नवीन स्टार्टअप्ससाठी महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी दिली.

सामजन्स कराराच्या माध्यमातून डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्री-इनक्यूबेट्सला पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर (PCSIC) मधील इनक्यूबेशन सुविधांचा फायदा होणार आहे. तसेच, पीसीएससीआय आणि डीआटी या संस्थांचा आसपासच्या स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी संयुक्त कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यास मदतीचा ठरेल. या कराराद्वारे दोन्ही संस्थांचे स्टार्टअप बळकट होवून DIT आणि MCCIA व इतर भागधारकांसोबत जोडणे सहज सोपे होणार असल्याचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.