PCMC News: मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे अध्यक्षपदी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी सहआयुक्त आशादेवी दुरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Melodies of Asha Bhosale Quiz 1 : जिंका ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’च्या दोन प्रवेशिका!

महापालिका सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 नुसार ही समिती पालिकेने स्थापन केली आहे. समितीवर अध्यक्ष व सदस्य असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानांतर, पदोन्नती, निवृत्ती व प्रशासकीय कामकाज विचारत घेऊन समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

सहआयुक्त दुरगुडे या अध्यक्ष आहेत. तर, समिती सदस्य सहायक आयुक्त सुषमा शिंदे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, लघुलेखक सुनीता पळसकर आहेत. कर्मचारी महासंघ प्रतिनिधी म्हणून उपलेखापाल शुभांगी चव्हाण या आहेत. अशासकीय संस्था सदस्य म्हणून जिव्हाळा महिला विकास प्रतिष्ठानच्या कविता खराडे आहेत. सामान्य प्रशासन विभागप्रमुख आणि आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी समिती सदस्य असणार आहेत. सदस्य सचिव कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.