India Corona Update : 2021 मधील रेकॉर्ड ब्रेक रुग्ण वाढ ; वाढले तब्बल 89,123 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2021 मधील रेकॉर्ड ब्रेक रुग्ण वाढ झाली असून, तब्बल 89 हजार 123 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 47 हजार 827 नवे रुग्ण वाढले आहेत. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 23 लाख 92 हजार 260 एवढी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 15 लाख 69 हजार 241 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 6 लाख 58 हजार 909 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 93.35 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत 714 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 64 हजार 110 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 24 कोटी 69 लाख 59 हजार 192 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 10 लाख 46 हजार 605 चाचण्या शुक्रवारी (दि.02) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 7 कोटी 30 लाख 54 हजार 295 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. एक एप्रिलपासून देशात 45 वर्षांवरील सर्वजण कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.