Record Gold Rate: सोन्याची विक्रमी झेप, 50 हजाराला गवसणी

Record Gold Rate: Record gold leap, reaching 50 thousand सोन्यातील तेजी आणखी काळ राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे यंदा सण-समारंभ, लग्नसराईवर मोठा परिणाम झाला. विवाहसोहळ्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व व्यवसायांचे नुकसान झाले आहे. यानिमित्त दरवर्षी सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत असते. पण यंदा विवाहसोहळ्याअभावी ही बाजारपेठ ठप्प होती. असे असतानाही सोन्याच्या दराने विक्रमी उडी घेतली आहे. सोन्याच्या दराने तब्बल 50 हजारांपर्यंत मजल मारली आहे.

गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 50 हजार रुपये झाला आहे. गुरुवारी मुंबईत सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 50 हजार 32 रुपये इतका होता.

सोन्यातील तेजी आणखी काळ राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मोठ्या देशांमधील केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजची तयारी सुरु केली आहे. मागील वर्षभरात सोन्याचे दर 15 हजार रुपयांनी वाढले आहेत.

भांडवली बाजारातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची पद्धत बदलली आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्यासारख्या मौल्यवान धातूला गुंतवणुकीसाठी पसंती दिल्याचे दिसते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.