Pimpri News : महापालिका तिजोरीत फेब्रुवारीत ‘रेकॉर्डब्रेक’ मालमत्ता कर जमा

  तब्बल 122 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका करसंकलन विभागाने फेब्रुवारी महिन्यात ‘रेकॉर्डब्रेक’ मालमत्ता कर जमा केला आहे.  शहरातील मालमत्ता कर वसूलीवर लक्ष केंद्रित करून फेब्रुवारी  महिन्यांत तब्बल 122 कोटी रुपयांची वसुली केली आहे

महापालिका हद्दीतील मालमत्तांवर करसंलन विभागाच्या वतीने कर आकारणी केली जाते. शहरात सध्या 5 लाख 30 हजार 278 मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या करापोटी महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडते. जकात आणि एलबीटी रद्द झाल्यांनतर महापालिका उत्पन्नाचा मोठा स्रोत बंद झाला. त्यामुळे करसंकलन विभागाच्या उत्पन्नावर पालिकेची मोठी भिस्त आहे.

शहरातील उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. परिणामी, शहरातील मालमत्तांमध्ये वाढ झाली आहे. 2010 मध्ये शहरातील मालमत्तांची आकडेवारी 2 लाख 88 हजारांवर होती.  2015 मध्ये शहरातील मालमत्तांची संख्या 4  लाख 7 हजारांवर पोहचिली.  तर, ऑगस्ट 2020 अखेर शहरात 5 लाख 30  हजार मालमत्ता आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या मालमत्ता धारकांकडून कर वसूल करण्याचे मोठे आव्हान कर आकारणी विभागाने पार पाडले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या संकटानंतर मोठी थकीत कर वसुली झाल्याने पालिकेच्या तिजोरीला मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 या दोन महिन्यांमध्ये कर आकारणी विभागाने 91 कोटी रुपयांची वसुली केली  आहे. तर, फेब्रुवारी 2021  या महिन्यात 122 कोटी रुपयांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळवले आहे.

करसंकलन व करआकारणी विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे म्हणाल्या, ”करसंकलन विभागाने यंदा थकीत कर वसुलीच्या उद्दिष्ट्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. याशिवाय महापालिका प्रशासनाने नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राबवल्या. यामध्ये अभय योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. याशिवाय वारंवार पाठपुरावा, तगादा, जप्ती आदेश यांसारख्या गोष्टींचीही अंमलबजावणी करावी लागली. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय कामगिरी चोख बजावली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.