India Corona Update : चोवीस तासांत 1,581 कोरोना रुग्णांची नोंद, 33 मृत्यू

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 1 हजार 581 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्याच्या घडीला 23 हजार 913 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 4 कोटी 30 लाख 10 हजार 971 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 24 लाख 70 हजार 515 रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 2,741 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.74 टक्के एवढा झाला आहे.
COVID19 | India logs 1,581 new cases & 33 deaths in the last 24 hours; Active caseload stands at 23,913
Total vaccination: 1,81,56,01,944
(Representative image) pic.twitter.com/iCwML5ut7X
— ANI (@ANI) March 22, 2022
गेल्या 24 तासांत देशभरात आजवर 5 लाख 16 हजार 543 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.
ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 78.36 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 5.68 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 181.56 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.