Pune : सराईत चोरट्यास अटक; 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – समर्थ पोलिसांनी घरफोडी करणा-या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या कडून 1 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून चार गुन्हे उघडकीस आणण्यात समर्थ पोलिसांना यश आले आहे.

अल्लाबक्ष महंमद पीरजादे (वय 30, रा. मंगळवार पेठ, पुणे) असे या चोरट्याचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपी हा रास्तापेठ भागात येणार असल्याची माहिती समर्थ पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला पकडले.

आरोपी अल्लाबक्ष विरुद्ध खडकी, मुंढवा, लष्कर पोलीस स्टेशन येथे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. समर्थ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like