Yerwada : तीन लाखांच्या मुद्देमालासह सराईत चोरट्यांना अटक; 8 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज – येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी, सोनसाखळी चोरी करणा-या सराईत चोरट्यांना बेड्या ठोकण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. येरवडा पोलिसांनी तीन लाखांच्या मुद्देमालासह दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आणले आहे. 

1)शकील शब्बीर शेख उर्फ काकड्या, (वय – 20 वर्ष) समीर शब्बीर शेख, (वय – 22 वर्षे, दोघे राहणार साठे वस्ती लोहगाव पुणे), अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

सपना कोठारी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दिनांक 6 ऑगस्टरोजी रात्री अकरा वाजता अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेले होते. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास करीत असताना पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे यांना त्यांच्या खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना लोहगाव येथून अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून येरवडा पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरी, मंगळसूत्र, मोबाईल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणण्यात येरवडा पोलिसांना यश आले. या कारवाईत आरोपींकडून चोरीच्या 5 दुचाकी, 1 चांदीची चेन, 1 सोन्याचे मंगळसूत्र, 2 चोरीचे मोबाईल, 5 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग सुनील फुलारी, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कनवरू,  येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, स पो फो/ बाळासाहेब बहिरट, पोलीस हवालदार हनुमंत जाधव, पो. नाईक शरद बांगर, मनोज कुदळे अशोक गवळी, कानिफनाथ कारखेले, सुनील नागनाथ, अजय पडोळे, राहुल परदेशी, समीर बोरडे, नवनाथ मोहिते, विष्णू सरोदे, पंकज मुसळे , नागेश कुवर, सुनील सकट यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.